मुंबई – शेअर बाजाराच्यानिर्देशांकात घसरणमुंबईमुंबई शेअर बाजाराच्या निर्देशांकात ५८१ अंकांच्या घसरण होऊन तो ७८ हजार ८८६ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही १८० अंकांच्या घसरणीसह २४ हजार ११७ अंकांवर बंद झाला.रिझर्व बँकेने रेपो दर जैसे थे ठेवण्याचा निर्णय घेतल्याने त्याचे मिश्र पडसाद शेअर बाजारात दिसून आले. आज मेटल, तेल, गॅस व आयटी क्षेत्रातील कंपन्याच्या शेअरच्या किंमतीत घसरण झाली. एशियन पेंटस, इन्फोसिस, पॉवरग्रीड आदी शेअरच्या दरातही घसरण झाली तर टाटा मोटर्स, भारती एअरटेलचे शेअर तेजीत राहिले.