मुकेश अंबानींचे बद्री-केदार मंदिरांना ५ कोटी रुपयांचे दान

डेहराडून – उद्योगपती मुकेश अंबानी यांनी काल उत्तराखंडमधील केदारनाथ आणि बद्रीनाथ या देवस्थानांना भेट दिली. यावेळी अंबानी यांनी बद्री-केदार मंदिर न्यासाला पाच कोटी रुपयांचे दान दिले.बद्रीनाथमध्ये अंबानी यांचे बद्रीनाथ-केदारनाथ मंदिर समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी स्वागत केले.पांढरा कुर्ता-पायजमा आणि त्यावर नेहरू जॅकेट अशा वेषात मुकेश अंबानी देवदर्शनासाठी आले होते.भगवान विष्णूचे बद्रीनाथ धाम हिमालयाच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले आहे. हिंदू धर्मात या देवस्थानांना मानाचे स्थान आहे.