शिमला – हिमाचल प्रदेश विधानसभेने मुलीच्या विवाहाचे किमान वय १८ वरुन २१ करण्याचा निर्णय घेतला आहे. हिमाचल विधीमंडळाने कालच या संबंधीचे विधेयक मंजूर केले आहे. याबरोबरच बालविवाह प्रतिबंधक विधेयक २०२४ ही काल आवाजी मतदानाने संमत करण्यात आले.मुलीचे विवाहाचे किमान वय वाढवण्याचे विधेयक आरोग्य व समाजिक न्याय मंत्री धानी राम शांदिल यांनी सादर केले. त्यानंतर ते मंजूर करण्यात आले. गेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशना दरम्यान हे विधेयक विधानसभेत मांडण्यात आले होते. मात्र त्यावेळी ते मंजूर झाले नव्हते. हे विधेयक आता राज्यपालांच्या मंजूरीसाठी पाठवण्यात येणार आहे. मुलींचे विवाहाचे किमान वय वाढवणारे विधेयक मंजूर करणारे हिमाचल प्रदेश हे पहिले राज्य ठरले आहे.