मुस्लिमांनाही आरक्षण द्या! अबु आझमी यांची मागणी


मुंबई – मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण देण्याचे विधेयक आज विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर झाले. या निर्णयाचे स्वागत करताना समाजवादी पार्टीचे नेते आ.अबू असीम आझमी आणि आ.रईस शेख यांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर मुस्लीम समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवरून आंदोलन केले, २०१८ मध्ये राज्य सरकारने मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देताना मुस्लीम समाजालाही शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ५ टक्के आरक्षण दिले होते. मात्र ते आरक्षण सर्वोच्च न्यायालयात टिकले नाही. त्यानंतर आज सरकारने पुन्हा एकदा मराठा आरक्षणाचे विधेयक मंजूर केले. मात्र यावेळी मुस्लीम समाजाला आरक्षण देण्यात आले नाही. याची आठवण करून देत आझमी आणि रईस शेख यांनी फलक झळकवत मुस्लीम आरक्षणाची मागणी केली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top