युक्रेनच्या सैन्याची रशियाच्या कुर्स्क प्रांतात जोरदार मुसंडी

किव्ह- युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात जोरदार मुसंडी मारली असून गेल्या तीन दिवसांपासून या प्रांतात जोरदार धुमश्‍चक्री सुरू आहे.युक्रेनच्या सैन्याने रशियाच्या कुर्स्क प्रांतात १० किलोमीटर आतपर्यंत मुसंडी मारली आहे, असे वॉशिंग्टनस्थित स्टडी ऑफ वॉर या निरीक्षक गटाने म्हटले आहे.

रशियाचे सैन्य आणि बॉर्डर गार्डनी युक्रेनच्या सैन्‍याला रशियाच्या नैऋत्येकडील कुर्स्क प्रांतात अधिक पुढे जाण्यापासून रोखून धरले आहे,असेही रशियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.युक्रेनच्या सैन्याच्या हालचालींबाबत युक्रेनच्या अधिकाऱ्यांकडून सुद्झा शहराच्या आजूबाजूला केल्या जात राबवलेल्या मोहीमेबद्दल कोणतीही माहीती दिली गेलेली नाही. रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी युक्रेनची ही घुसखोरी म्हणजे चिथावणी असल्याचे म्हटले आहे. युक्रेनच्या सैन्याकडून नागरी भागावर केल्या जाणाऱ्या माऱ्याला रोखण्यासंदर्भात पुतीन यांनी वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केली. त्यांनी मंत्रिमंडळाला कुर्स्क प्रदेशातील मदतीसाठी समन्वय ठेवण्याचे निर्देश दिले.ही लढाई मॉस्कोपासून सुमारे ५०० किमी अंतरावर सुरू आहे.