युक्रेनने पाडले रशियाचे २४ ड्रोन

कीव
युक्रेनच्या लष्कराने कीव वर हल्ला करणारे २४ ड्रोन पाडले आहेत. गेल्या काही दिवसांमधील युक्रेनची ही सर्वात मोठी सरशी मानली जात आहे. तर आपल्या सैनिकांच्या हत्येमागे युक्रेनचा हात असल्याचा आरोप करत माली देशाने युक्रेनबरोबरच संबंध पूर्णपणे तोडले आहेत.
युक्रेनच्या कंमाडरने सांगितले की, रशियाने काल रात्री किव शहरावर हल्ला करण्यासाठी तब्बल चोवीस ड्रोन पाठवले. या ड्रोनमध्ये अनेक स्फोटके होती. हे ड्रोन हवेतल्या हवेतच उडवल्याने मोठी दुर्घटना टळली आहे. किवसह खारखेव, विनटसिया, किरोव्हार्ड, समी, पोल्टावा आणि दिनप्रो या भागातील अनेक भागात रशियाने हल्ले केले होते हे सारे हल्ले युक्रेनने निष्प्रभ केले.
दरम्यान, आपल्या काही सैनिकांच्या हत्येत युक्रेनचा सहभाग असल्याचा आरोप करत माली या देशाने युक्रेनबरोबरचे सर्व राजकीय संबंध तोडत असल्याची घोषणा केली आहे. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला माली या देशाकडून लष्करी मदत केली जात होती. मात्र, युक्रेनने रशियाच्या भाडोत्री दहशतवाद्यांबरोबर मालीच्याही काही सैनिकांची हत्या केली, असा आरोप मालीने केला आहे.