युद्धाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री इस्रायल दौऱ्यावर

वॉशिंग्टन- हमासच्या दहशतवाद्यांनी इस्रायलवर केलेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इस्रायलला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहिर केले. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री अँटोनी ब्लिंकन इस्रायलला भेट देणार आहेत. त्यांचा हा दौरा तीन दिवसांचा असणार आहे. अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. ब्लिंकेन उद्या इस्रायलला पोहोचतील. राष्ट्रपतींचा हा दौरा इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी असणार आहे, असे अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाने प्रसिद्धपत्रकात म्हटले आहे. युद्धाच्या काळात ब्लिंकन यांचा इस्रायल दौरा अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.
ब्लिंकन इस्रायलला पोहोचल्यानंतर अनेक वरिष्ठ नेत्यांची भेट घेणार आहेत. अमेरिकेचा इस्रायलला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्यांचा हा दौरा असेल. ब्लिंकन उद्या इस्रायलला पोहोचणार आहेत, अशी माहिती अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी दिली. अमेरिकेने यापूर्वीच इस्रायलला पूर्ण पाठिंबा असल्याचे जाहीर केले आहे. मेरिकेने काल रात्री इस्रायलला दारूगोळा भरलेले विमान पाठवले. तसेच अमेरिकेने आपली एक विमानवाहू युद्धनौका इस्रायलच्या आसपास पाठवली आहे.
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याकडून युद्धाच्या परिस्थितीची माहिती घेतली.यानंतर जो बायडेन यांनी मंगळवारी रात्री उशिरा व्हाईट हाऊसमधून केलेल्या भाषणात अमेरिका इस्रायलसोबत असल्याचे सांगितले. हमासच्या इस्रायलवरील हल्ल्याबाबत ते म्हणाले की, येथे १००० लोकांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. यामध्ये १४ अमेरिकन नागरिकांचा मृत्यू झाला होता.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top