Home / News / रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला

रत्नागिरीच्या किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला

रत्नागिरी- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारीपट्टी भागात गारठ्यात आणखी वाढ होण्याची...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

रत्नागिरी- मागील दोन दिवसांपासून जिल्ह्यातील समुद्र किनारपट्टी भागात गारठा वाढू लागला आहे. नोव्हेंबरच्या अखेरीस किनारीपट्टी भागात गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे आंब्यासह काजू बागायतदारांनी हंगामाची जुळवाजुळव सुरू केली आहे.

दोन दिवसांपूर्वी रत्नागिरी तालुक्यात झालेला पाऊस आणि मळभ असलेले वातावरण आता निवळले आहे. त्यामुळे जिल्ह्यात पहाटे आणि रात्री गारठा जाणवू लागला आहे. परिणामी आंब्यासह काजू बागायतदारांनी हंगामाची जुळवाजुळव सुरू केली आहे.पावसाचा शिडकावा झाल्यानंतर आंबा बागायतदार चिंतेत होते. त्यात थंडी न पडल्याने आंबा हंगाम लांबण्याचीही भीती होती; मात्र सोमवारपासून थंडीचे प्रमाण वाढू लागले आहे. सकाळी आणि रात्री हलका गारठा पडू लागला आहे. सोमवारी ग्रामीण भागात पहाटे २८ अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली. सकाळी ते अर्ध्या अंशाने वाढले होते. दुपारी मात्र तापमान ३० अंशांवर होते. देवदिवाळी जवळ आल्याने जोरदार वारे सुटल्याने गारठ्यात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Web Title:
संबंधित बातम्या