रमाबाई नगरच्या पुनर्विकासासाठी एमएमआरडीए सल्लागार नेमणार

मुंबई- राज्य सरकारने मुंबईतील घाटकोपर पूर्वेला असलेल्या रमाबाई नगर झोपडपट्टीचा पुनर्विकास एमएमआरडीए आणि एसआरए प्राधिकरणाच्या संयुक्तिक भागीदारी पध्दतीने राबविण्याचा निर्णय घेतला आहे.१६,५७५ झोपडीधारकांसाठी होणार्‍या या प्रकल्पासाठी आता एमएमआरडीए पीएमसी म्हणजेच प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमणार आहे.त्यासाठी निविदाही मागविण्यात आल्या आहेत.

घाटकोपरच्या रमाबाई नगर आणि कामराज नगर येथील झोपड्यांचा पुनर्विकास करण्याचा हा प्रकल्प आहे.यामध्ये झोपड्यांचे सर्वेक्षण पात्रता निश्चिती,जागा मोकळी करणे आणि पुनर्वसित इमारती ताब्यात घेऊन पात्र रहिवाशांना त्यांच्या घराचा ताबा देणे ही कामे एसआरए म्हणजेच झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरण करणार आहे. तर इमारतींच्या बांधकामाची जबाबदारी एमएमआरडीए सांभाळणार आहे. त्यामुळे आता एमएमआरडीएने आपल्या कामाला मदत म्हणून प्रकल्प व्यवस्थापन सल्लागार नेमण्याचा निर्णय घेतला आहे.त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू केली आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top