रस्त्याच्या कामासाठी वरंध घाट पुन्हा बंद

रायगड :

पुणे शहरातून कोकणात जाणारा वरंध घाट बंद करण्यात आला आहे. भोरमार्गे महाडला जाणाऱ्या वरंध घाट मार्गावरची सर्व प्रकारची वाहतूक पुन्हा बंद करण्यात आली आहे. वरंध घाटातील रायगड जिल्ह्याच्या हद्दीत २१ किलोमीटर लांबीच्या रस्त्याची कामे पुन्हा सुरु करण्यात येत आहेत. त्यामुळे वाहतूक बंद करण्यात आली.

पुण्यावरून कोकणात जाण्यासाठी वाहनधारकांनी राजेवाडी फाटा-माणगाव-निजामपूर रोड-ताम्हाणी घाट-मुळशी पिरंगुट पुणे व पोलादपूर आंबेनळी घाट वाई मार्गे पुणे असा मार्ग वापरावा लागणार आहे. तसेच कोल्हापूरकडे जाण्यासाठी राजेवाडी फाटा-पोलादपूर-खेड-चिपळुण-पाटण-कराड- कोल्हापूर असा पर्यायी मार्ग वापरावा लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top