जयपूर – राजस्थानातील पावसाच्या कहरामुळे अनेक गावे पाण्याखाली गेली असून जालोर जिल्ह्यातील पूरस्थितीमुळे ५ जणांचा मृत्यू झाला आहे.राजस्थानातील जालोर जिल्ह्यातील जसवन्तपुरा भागातील सुंधा माता मंदिराच्या पायऱ्यांवरुन पाण्याचा मोठ्या प्रवाहात वाहून गेल्याने एका महिलेचा मृत्यू झाला असून एकजण बेपत्ता आहे. यावेळी वाहून जाणाऱ्या ३ जणांना वाचवण्यात यश आले. राज्यात विविध ठिकाणी घडलेल्या दुर्घटनांमध्ये एकूण ५ जणांना आपला जीव गमवावा लागला. राजस्थानमधील उदयपूर, धौलपूर, बांसवाडा, प्रतापगढ, कोटा, अजमेर, भीलवाडा, जालौर सह अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस झाला. पावसाचा जोर २७ ऑगस्टपर्यंत कायम राहण्याची शक्यता जयपूरच्या हवामान विभागाने वर्तवली आहे.