राज्याच्या बारावी परिक्षेचा आज निकाल

पुणे
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या बारावीच्या परिक्षेचा निकाल उद्या दुपारी १ वाजता ऑनलाईन पद्धतीने लागणार आहे. बारावीच्या परीक्षेला यंदा १५ लाख १३ हजार ९०९ विद्यार्थी बसले होते. विद्यार्थ्यांना विषयनिहाय संपादित केलेले गुण mahresult.nic.in, http://hscresult.mkcl.org,www.mahahsscboard.in, https://results.digilocker.gov.in, http://results.targetpublications.org या संकेतस्थळांवरुन उपलब्ध होतील आणि याची प्रत (प्रिंट आउट) घेता येईल. Digilocker app मध्ये Digital गुणपत्रिका संग्रहीत करून ठेवण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. www.mahresult.nic.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांच्या निकालासह निकालाबाबतची इतर सांख्यिकीय माहिती उपलब्ध होईल. www.mahahsscboard.in या संकेतस्थळावर कनिष्ठ महाविद्यालयांचा एकत्रित निकाल उपलब्ध होईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top