राज्यातील आठ जिल्ह्यांना पावसाचा इशारा

मुंबई- बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यातील आठ जिल्ह्यांमध्ये १४ आणि १५ नोव्हेंबर रोजी हलक्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. राज्यातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, धाराशिव या आठ जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे. तर थंडीची चाहूल लागलेली असताना अचानक पुन्हा पावसाचा इशारा दिल्यामुळे आगामी काही दिवस राज्यात ढगाळ वातावरण राहणार आहे. त्यामुळे शेतकरी देखील चिंतेत आहेत.