नाशिक – नाशिक जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यात वादळी गारपिटीमुळे फळबागांचे नुकसान झाले. या भागात आणखी दोन दिवस गारपीट, अवकाळी पावसासह सोसाट्याचा वारा राहणार असल्याचा अंदाज इगतपुरी भात संशोधन केंद्र व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाने दिला.
नांदेड, हिंगोली, परभणी व बीड, जालना जिल्ह्यात मंगळवारी गारपीट व अवकाळी पावसामुळे नुकसान झाले. नांदेड जिल्ह्यातील कंधार व किनवट तालुक्यात वीज पडून ५ जनावरे दगावली. हिंगोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे केळीच्या झाडांचे नुकसान झाले. मराठवाड्यात गारपीट, सोसाट्याच्या वार्यामुळे घरावरील पत्रे उडाले. तसेच महाराष्ट्रातील विदर्भ भागातील गारपिटीमुळे २६ एप्रिलपासून यलो व आॅरेंज अलर्ट जाहीर करण्यात आला. वेधशाळेच्या अंदाजानुसार या भागात वार्याचा वेग ताशी ४० ते ५० किमी राहील. राज्यात उर्वरित भागात मुंबई व नागपूर वेधशाळेने यलो अलर्ट जाहीर केला आहे. इथे वार्याचा वेग ताशी ३० ते ४० किमी राहील. याशिवाय मध्य प्रदेश, महाराष्ट्रापासून ते दक्षिण तामिळनाडूपर्यंत सभोवतालच्या परिसरावर ९०० मीटर उंचीवर गोलाकार वाऱ्यांची स्थिती आहे. पुढील दोन दिवसांत हवामान खात्याने २७ एप्रिलला दक्षिणेकडील केरळ, तेलंगणमध्ये आणि २८ एप्रिलला ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश, आसाम आणि मेघालयात पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, तेलंगण, प. बंगाल, सिक्कीम, ओडिशा, विदर्भ, दक्षिण छत्तीसगडमध्ये पावसासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवण्यात आली.
राज्यात पुन्हा अवकाळी पाऊस! गारपिटीमुळे शेत, बागांचे नुकसान
