राहुल गांधींची सोलापूर, अमरावतीमध्ये जाहीर सभा

मुंबई

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडले असून दुसऱ्या टप्प्यातील मतदानाची तयारी सध्या सुरू आहे. सोलापूरमध्ये २६ एप्रिल तर अमरावतीमध्ये ७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेते राहुल गांधी उद्या महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. ते अमरावती लोकसभा मतदारसंघातील मविआचे उमेदवार बळवंत वानखेडे आणि सोलापूर लोकसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार प्रणिती शिंदे यांच्या प्रचारासाठी जाहीर सभा घेणार आहेत.

अन्नातून झालेल्या विषबाधेतून सावरल्यानंतर राहुल गांधी पुन्हा सक्रिय होत आहेत. ते प्रणिती शिंदे यांच्या प्रचारार्थ उद्या सोलापुरात जाहीर सभा घेणार आहेत. सोलापुरातील मरीआई चौकातील एक्झिबिशन मैदानावर या सभेचे आयोजन करण्यात आले आहे. माजी केंद्रीय मंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी सभास्थळाची पाहणी केली आहे. सोलापूर लोकसभा निवडणूकीतून वंचितच्या उमेदवाराने माघार घेतल्यामुळे आता प्रणिती शिंदे विरुद्ध आमदार राम सातपुते यांच्या थेट लढत होणार आहे. तर, अमरावतीमध्ये बळवंत वानखेडे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधींची दुसरी जाहीर सभा होणार आहे. बळवंत वानखेडे यांच्या विरुद्ध महायुतीच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यात लढत होणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top