नाशिक- विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते यांना नाशिक जिल्हा न्यायालयाने समन्स बजावले आहे. २०२२ मध्ये महाराष्ट्रमध्ये येऊन हिंगोली च्या सभेत स्वातंत्र्यवीर सावरकरांची बदनामी केल्या प्रकरणी आणि आक्षेपार्ह विधान करून दोन समाजात तेढ निर्माण केल्याप्रकरणी निर्भय फाऊंडेशनचे देवेंद्र भुतडा यांनी नाशिकच्या जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली होती. तिची दखल घेऊन नाशिक जिल्हा न्यायालयाने राहुल गांधी यांना समन्स बजावले आहे.