राहूल गांधी ११ जूनला रायबरेलीला जाणार

रायबरेली- वायनाड आणि रायबरेली या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झालेले काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी ११ जूनला रायबरेलीला जाणार आहेत. त्यासोबत काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि प्रियंका गांधी रायबरेलीतील जनतेचे आभार मानण्यासाठी उपस्थित असणार आहे.
त्यानंतर राहुल गांधी १२ जूनला वायनाडच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही दौऱ्यानंतर वायनाडमधील खासदारकीचा राहुल गांधी राजीनामा देणार आहेत. यावेळी राहुल गांधी यांनी रायबरेली आणि वायनाडमधून निवडणूक लढवली होती. दोन्ही जागांवर त्यांनी 3 लाखांहून अधिक मतांनी विजय मिळवला. आता राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि सोनिया गांधी 11 जूनला रायबरेलीला जाणार आहेत. तेथील ते लोकांना भेटून त्यांचे आभार मानणार आहे. दरम्यान, राहुल गांधी पहिल्यांदाच रायबरेली मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवली. या मतदारसंघातून सोनिया गांधी निवडणूक लढवत होत्या. प्रकृतीचे कारण सांगून सोनिया गांधी यांनी लोकसभा निवडणुकीत भाग घेतला नाही.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top