पाटणा- बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव यांची प्रकृती पुन्हा बिघडली होती .सोमवारी लालू प्रसाद यांच्या छातीत दुखू लागल्यामुळे त्यांना दिल्लीतील एम्समध्ये दाखल होते. मात्र त्यांची प्रकृती सुधारल्यानंतर काल दुपारी अडीच वाजता त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज दिला.
लालू यादव यांच्यावर २ वर्षांपूर्वी सिंगापूरमध्ये किडनी प्रत्यारोपण केले होते. वाढत्या वयामुळे लालू प्रसाद यांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो आहे. त्यामुळे ते राजकारणात फारसे सक्रिय नाहीत. याआधीही त्यांना अशाच प्रकारे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.