वर्सोवा खाडी येथे परदेशी सीगल पक्ष्यांचे आगमन

मुंबई

मुंबईजवळच्या घोडबंदर या ठिकाणी असलेल्या वर्सोवा खाडीकिनारी सध्या परदेशी सीगल पक्ष्यांचे आगमन झाले आहे. दरवर्षीच्या हिवाळ्यात असंख्य प्रजातींच्या समुद्री पक्ष्यांचे भारतातील समुद्राकिनारी विशेषत: खाडी परिसरात आगमन होते. यंदाही परदेशी पाहुणे सीगल भारतात दाखल झाले आहेत. वर्सोवा खाडी येथे मोठ्या प्रमाणात सीगल पक्षी पाहायला मिळत आहेत.

वर्सोवा खाडी पात्रात सध्या मनसोक्त विहार करणाऱ्या स्थलांतरित पांढऱ्या शुभ्र सीगल पक्षांचे थवे उडताना दिसत आहेत.या सीगल पक्ष्यांना पाहण्यासाठी आणि फोटो काढण्यासाठी पक्षीप्रेमी आणि नागरिकांची वर्सोवा पुलावर गर्दी होत आहे. अमेरिका आणि युरोपमधील हे सीगल पक्षी दरवर्षी हजारो किलोमीटरचा प्रवास करून भारताच्या विविध खाडी किनारी दाखल होतात. पांढरा शुभ्र रंग, पंखावर करडा रंग, लालसर काळी चोच आणि कोळेभेर बोलके डोळे असे मोहक रूप असलेले हे पक्षी पुढचे काही दिवसइथेच मुक्काम करतील आणि उन्हाळ्याची चाहुल लागताच पुन्हा माघारी परततील.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top