‘विलिंग्डन’चे आजीवन सदस्यत्व शासन निर्णय रद्द करण्याची मागणी

मुंबई – कुलाब्यातील भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या धर्तीवर ताडदेव येथील विलिंग्डन स्पोर्ट्स क्लबमध्ये ५० व्यक्ती आणि सनदी अधिकारी यांना मोफत आजीव सदस्यत्व नामनिर्देशित करण्याचा सरकारी निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात नार्वेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मागणीपत्र पाठवले आहे. हा निर्णय रद्द केल्यास शहरातील ऐतिहासिक आणि प्रतिष्ठित मोकळ्या जागांचे संरक्षण होण्यास मदत होईल, असेही त्यांनी म्हटले.

मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या पत्रात नार्वेकर यांनी म्हटले आहे की, विलिंग्डन स्पोर्ट्स हा क्लब शतकाहून अधिक जुना आहे आणि मुंबईतील प्रमुख क्रीडा आणि सामाजिक क्लबपैकी मानला जातो.१४ मार्च २०२४ रोजी या क्लबमध्ये ५० आजीवन सदस्य मोफत नामनिर्देशित करण्याबाबत शासननिर्णय प्रसिद्ध झाला आहे. हा निर्णय केवळ अनुसूचित मालमत्तांना लागू आहे. असाच निर्णय सरकारने रॉयल वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबसाठीही घेतला होता. नंतर त्यातून
नोकरशहाबाबतची तरतूद काढून टाकण्यात आली.
त्याचप्रमाणे विलिंग्डन स्पोर्ट्स निर्णयातही तत्काळ सुधारणा करणे गरजेचे आहे. कारण शहरातील इतर क्लब आणि जिमखान्यासाठी हा पायंडा पडेल.शिवाय एकाचवेळी अधिक माणसांना निवडल्यामुळे क्लबच्या सांस्कृतिक आणि समृद्ध इतिहासाला बाधा पोहचण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top