विषबाधेच्या शक्यतेमुळे अमेरिकन कंपनीने बाजारातून आईस्क्रीम परत मागवली

कॅलिफोर्निया – विषाणू संसर्ग आणि त्यामुळे होऊ शकणाऱ्या विषबाधेच्या शक्यतेमुळे कॅलिफोर्नियातील ट्रॉपिकल फूडस या कंपनीने बाजारातून मिनी आईसक्रीमची हजारो पाकिटे परत मागवली आहेत. अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाने शनिवारी आपल्या वेबसाईटवर ही माहिती दिली.
कंपनीच्या हेलाडोज मेक्सिको मिनी आईसक्रीममध्ये साल्मोनेल्ला विषाणु संसर्ग झाल्याचे चाचणीमध्ये आढळून आले आहे. साल्मोनेल्ला संसर्गामुळे लहान मुले आणि वृध्द व्यक्तींना सामान्य स्वरुपाची किंवा गंभीर स्वरुपाची अन्न विषबाधा होऊ शकते.त्यामुळे खबरदारीचा उपाय आंब्याचा स्वाद असलेली (मँगो फ्लेव्हर्ड) आईसक्रीम ५ हजार २२४ पाकिटे बाजारातून परत मागविण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे.
१० नोव्हेंबर २०२५ अशी एक्सपायरी डेट असलेली ही आईसक्रीम कंपनीच्या वितरण विभागाच्या वतीने अमेरिकेत सोळा राज्यांमध्ये विक्रीसाठी वितरित करण्यात आली आहेत. आयोवा, इलिनॉईस, इंडियाना, केंटूकी, मॅसॅच्युसेटस, मेरीलँड, मेन, मिशीगन, नॉर्थ कॅरोलिना, न्यू हॅम्पशायर, ऱ्होड आयलंड, साऊथ कॅरोलिना, टेनेसी, व्हिस्कॉसीन आणि वेस्ट व्हर्जिनिया या राज्यांचा समावेश आहे. अमेरिकेची राजधानी वॉशिंग्टन आणि युरोपमधील काही शहरांमध्येही ही आईसक्रीम वितरीत करण्यात आली आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top