नांदेड – जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील पिंपळकोठा येथे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे वीज पडून एका तरुणाचा मृत्यू झाला. दत्ता दिगंबर वाघमारे असे मृत तरुणाचे नाव आहे.
काल सायंकाळी दत्ता शेतातून घरी परतत असताना अचानक वादळी वारा आला आणि अवकाळी पाऊस सुरू झाला. पावसापासून वाचण्यासाठी झाडाचा आधार घेऊन तो थांबला होता. त्याचवेळी वीज अंगावर पडल्याने त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली होती.