वॉल्ट डिस्ने -रिलायन्समध्ये विलिनीकरणाचा करार

मुंबई- अमेरिकेतील मनोरंजन क्षेत्रातील मोठी कंपनी वॉल्ट डिस्ने आणि दिग्गज उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड यांनी भारतातील त्यांच्या मीडिया व्यवसायाच्या विलीनीकरणासाठी करार केला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा मात्र अद्याप करण्यात आलेली नाही. वृत्तसंस्था ब्लूमबर्गने सूत्रांच्या हवाल्याने ही माहिती दिली आहे.

ब्लूमबर्गच्या अहवालानुसार, मुकेश अंबानी यांच्या नियंत्रणाखालील रिलायन्सचे मीडिया युनिट आणि त्यांच्या संलग्न कंपन्यांकडे विलीन झालेल्या संस्थेमध्ये किमान ६१ टक्के हिस्सा असणे अपेक्षित आहे. उर्वरित भागभांडवल वॉल्ट डिस्नेकडे राहील.म्हणजेच विलीनीकरणानंतर स्थापन झालेल्या नवीन कंपनीचे मालकी हक्क मुकेश अंबानी यांच्याकडे असतील.सध्या या कराराची माहिती सार्वजनिक करण्यात आलेली नाही.येत्या काही दिवसांत त्याची घोषणा होण्याची शक्यता आहे.

हा करार अंतिम होईपर्यंत डिस्नेच्या इतर स्थानिक मालमत्तांचा समावेश कसा केला जातो त्यानुसार दोन कंपन्यांमधील स्टेक स्प्लिट बदलू शकतो. टाटा समूहाची होल्डिंग कंपनी टाटा सन्सची सॅटेलाइट टेलिव्हिजन ब्रॉडकास्टर टाटा प्लेमध्ये ५०.२ टक्के आणि वॉल्ट डिस्नेची २९.८ टक्के हिस्सेदारी आहे.उर्वरित भागभांडवल सिंगापूर फंड टेमासेककडे आहे. टाटा प्लेवरील चर्चा यशस्वी झाल्यास,टाटा समूह आणि अंबानी पहिल्यांदाच एका उपक्रमात संयुक्त भागीदार होतील आणि टाटा प्ले प्लॅटफॉर्मवर जिओ सिनेमाचा विस्तार केला जाईल.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top