शंभर दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण! शरद पवारांचा पटलावार

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होऊन १०० दिवसू पूर्ण झाल्यानिमित्त राज्यातील जनतेशी पत्राद्वारे संवाद साधला. या पत्रात अजित पवार यांनी स्वत:चा राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष असा उल्लेख केला आहे. या पत्राला राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाने प्रत्युत्तर दिले आहे. १०० दिवस महाराष्ट्राचा स्वाभिमान दिल्लीपुढे गहाण, अशी टीका शरद पवार गटाने अजित पवारांवर केली आहे.
शरद पवार गटाने १०० दिवसांत काय-काय झाले अशी सविस्तर पोस्ट एक्स अकाउंटवर शेअर केली आहे. शरद पवार गटाने पोस्टमध्ये म्हटले की, “१०० दिवस छत्रपती – फुले-शाहू-आंबेडकरांच्या विचारांना तिलांजली देण्याचे, १०० दिवस मायबाप शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आणण्याचे, १०० दिवस वारकऱ्यांवर, मराठा आंदोलकांवर लाठी हल्ला करणाऱ्या नतद्रष्ट्यांसोबतचे, १०० दिवस रुग्णालयांतील मृत्यूकांडास जबाबदार असंवेदशनील सरकारसोबतचे.१०० दिवस महाराष्ट्राचे हक्काचे रोजगार, प्रकल्प हिरावून घेणाऱ्याा महाराष्ट्रविरोधकांसोबतचे, १०० दिवस माताभगिनींवर अन्याय करणाऱ्या वृत्तीसोबत राज्यकारभार करण्याचे, १०० दिवस मराठा, ओबीसी, धनगर, लिंगायत समाजाचे आरक्षण रखडवणाऱ्या आरक्षणविरोधकांसोबतचे, १०० दिवस मराठी अस्मितेची गळचेपी करणाऱ्या महाराष्ट्रद्रोह्यांसोबतचे. १०० दिवसांचे कर्तृत्व सांगावे लागणे यातच तुमच्या चुकीच्या निर्णयाबद्दलची मनातील खंत लख्ख दिसून येत आहे. पुरोगामी विचारांचा वारसा घेऊन जगणारा कधीच दिल्लीच्या तख्तापुढे आपला महाराष्ट्र स्वाभिमान गहाण ठेवत नाही. जो तुम्ही गेले १०० दिवस गहाण ठेवलात.”

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top