शर्यतीच्या बैलांना कानाला बिल्ला लावणे बंधनकारक

मुंबई- शर्यतीतील बैलांच्या कानाला बिल्ला लावणे बंधनकारक करण्यात आले आहे.त्यामुळे आता १ जूनपासून एअर टॅग अर्थात कानाला बिल्ला नसलेल्या बैलांना शर्यतीमध्ये सहभागी होता येणार नाही,तसे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.तसेच बिल्ला लावला नसलेल्या पशुधनाची खरेदी- विक्रीही करता येणार नाही.

केंद्र सरकारच्या पशुसंवर्धन विभागाने ‘नॅशनल डिजिटल लाईव्ह स्टॉक मिशन‘ ही भारत पशुधन प्रणाली आणली आहे.या प्रणालीनुसार जनावराच्या कानाला एक टॅग लावण्यात येतो.त्यात एक १२ अंकी बारकोड असतो. यामध्ये पशुची जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्यात येते. रोग प्रतिबंधात्मक लसीकरण आणि औषधोपचार, वंध्यत्व उपचार, मालकी हक्क हस्तांतरण याची नोंद ठेवण्यात येते.पशुधनाचे प्रजनन,त्याचा मालक, जन्म-मृत्यू,आजार,त्यावर केलेले उपचार आदींची माहिती ठेवण्यात येते. म्हणजे जनावराची संपूर्ण हिस्ट्रीच जमा करण्यात येते.

इअर टॅग एक बारकोड पद्धत सॉफ्टवेअरमध्ये डेव्हलप केलेली आहे.त्याची नोंद भारत सरकारकडे असते. बाजार समिती, आठवडी बाजार खरेदी विक्री संघ, यांनी इतर पशुधनाची ही विक्री करताना हा इअर टॅग दिला आहे का नाही यावर लक्ष द्यावे लागणार आहे. नसेल तर अशा विक्रीवर बंदी घालावी, असा शासन आदेश आला आहे, तेव्हा बैलगाडा शर्यतीत भाग घेण्यापूर्वी बैलांना इअर टॅगिंग करून घ्यावे लागणार आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top