गडचिरोली
शासकीय आणि भाजपच्या कामात व्यस्त असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचा 9 डिसेंबरचा गडचिरोली जिल्हा दौरा आणि प्रस्तावित कार्यक्रम तूर्त रद्द करण्यात आला आहे. अमित शहांच्या दौऱ्याची पुढील तारीख मिळाल्यानंतर हे कार्यक्रम संपन्न होणार आहे. याबाबतची माहिती खासदार अशोक नेते यांनी दिली.
गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकास कामांचे आणि प्रकल्पांचे भूमिपूजन, कोनसरी येथील लोहप्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन आणि दुसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन आणि वडसा-गडचिरोली रेल्वे लाईनच्या कामाचे भूमिपूजन, चिचडोह बॅरेजचे लोकार्पण अमित शहांच्या हस्ते होणार होते. परंतु काही महत्वपूर्ण कामांमुळे शहांना गडचिरोली दौरा पुढे ढकलावा लागल्याचे अशोक नेते म्हणाले. यापूर्वी 18 नोव्हेंबरला शहांचा गडचिरोली दौरा होणार होता. परंतु तो निश्चित होण्याआधीच रद्द झाला होता.आता दुसऱ्यांदा त्यांनी तारीख बदलविली.
शहांचा शनिवारचा गडचिरोली दौरा रद्द
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2023/08/Amit-Shah-1024x683.jpg)