श्रीनगर – जम्मू आणि काश्मीरमधील कुलगाममधील दोन भागात सुरू असलेल्या संघर्षात सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. त्यात लान्स नाईक प्रदीप नैन यांच्यासह दोन जवांनाना वीरमरण आले. प्रदीप हे लवकरच बाप बनणार होते.शहीद कमांडो प्रदीप नैन हे नरवानाच्या जिंद गावचे रहिवासी असून २०१५ मध्ये कमांडो सैन्यात दाखल झाला होता. प्रदीपचे २०२२ मध्ये लग्न झाले. ते लवकरच वडील बनणार होते. प्रदीप यांची गरोदर पत्नी आणि त्यांचे कुटुंब त्यांच्या परतीच्या वाटेकडे डोळे लावून बसले होते, असे प्रदीप यांच्या काकांनी सांगितले.कुलगाम जिल्ह्यातील मोदरगाम आणि चिनिगाम गावात सहा दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात सुरक्षा दलाला यश आले. सहा दहशतवाद्यांपैकी दोन मदरगाममध्ये तर चार चिनीगाममध्ये ठार झाले. विशेष म्हणजे, गेल्या काही दिवसांपासून सुरक्षा दलांनी जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरोधातील कारवाई तीव्र केली आहे.मोदरगाम गावात झालेल्या चकमकीत पॅरा कमांडो लान्स नाईक प्रदीप नैन कारवाईत शहीद झाले. दुसरी चकमक फ्रिसल चिनिगाम गावात झाली. या चकमकीत राष्ट्रीय रायफल्सचे हवालदार राज कुमार यांना वीरमरण आले.
