नवी दिल्ली- भारतीय क्रिकेट संघातील सलामीचा फलंदाज शिखर धवन याने आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. लोशल मीडियावर व्हीडिओ पोस्ट करून त्याने ही माहिती दिली.शिखर धवन 2022 मध्ये बांगलादेशविरुद्धचा शेवटचा एकदिवसीय सामना खेळला. त्यानंतर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर होता. शिखरने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये म्हटले की, मी माझ्या क्रिकेट प्रवासाचा अध्याय संपवत आहे. मी माझ्यासोबत असंख्य आठवणी घेऊन जात आहे. मला दिलेल्या प्रेम आणि पाठिंब्याबद्दल धन्यवाद! जय हिंद.

								
								
								
								
								
				
															
								
								
								
								
								
								







