शिरीन लोखंडे यांची सहआयुक्तपदी नियुक्ती

मुंबई

कामगार विभागात गेल्या तीस वर्षांपासून कार्यरत असलेल्या शिरीन संजू लोखंडे यांची सरकारने कामगार सहआयुक्तपदी नियुक्ती केली. सहआयुक्तपदी लोखंडे या पदोन्नती मिळालेल्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या आहेत. कामगार आयुक्तालयातील कर्मचाऱ्यांना ऑनलाइन प्रशिक्षण, बालकामगारांची सुटका, कामगार कायद्यांबाबत जागरुकतेच्या कार्यशाळा अशा अनेक उपक्रमांमध्ये लोखंडे यांचा सक्रिय सहभाग आहे. त्यांच्या पदोन्नतीबाबत हर्षदीप कांबळे, प्रशांत नारनवरे, डॉ. संजय अपरांती, रावसाहेब कसबे, संगीता हरि नरके, श्रीमंत कोकाटे इत्यादींनी शुभेच्छा दिल्या.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top