शिवसेनाप्रमुखांच्या स्मारक विरोधातील याचिकेत दुरुस्ती करा! हायकोर्टाचे निर्देश

मुंबई-शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे स्मारक उभारण्यासाठी दादरच्या शिवाजी पार्क परिसरातील महापौर बंगल्याची जागा मिळाली आहे. याला विरोध करणारी याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे. या याचिकेत दुरुस्ती करावी, असे निर्देश न्यायालयाने याचिकाकर्त्याला दिले आहेत. दरम्यान यावर पुढील सुनावणी जूनपर्यंत तहकूब केली आहे.

नगरविकास खात्याने २६ जानेवारी २०१६ रोजी पालिका आयुक्तांना आदेश देऊन महापौर बंगल्याची जागा स्मारकासाठी हस्तांतरित करण्याचे आदेश दिले होते. याविरोधात मानव जोशी आणि जनहित मंचचे अध्यक्ष भगवानजी रयानी यांनी विरोध करत न्यायालयात धाव घेतली होती. या याचिकेची सुनावणी मुख्य न्यायमूर्ती देवेंद्र उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठापुढे झाली. यावेळी स्मारकाने हा निर्णय आवश्यक परवानग्या घेऊन आणि नियमानुसार घेतल्याचा दावा सरकारच्या शपथपत्रात करण्यात आला आहे. यामध्ये याचिकाकर्त्याला याचिकेत दुरुस्ती करण्याचे निर्देश देत सुनावणी जूनपर्यंत पुढे ढकलली.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top