मुंबई – भारतीय शेअर बाजारात आज विक्रमी उच्चांकाची नोंद झाली. या तेजीच्या लाटेवर दिवसभर बाजारावर नफा वसुली करणाऱ्यांचे वर्चस्व राहिले.त्यामुळे मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आणि राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी उचांक गाठल्यानंतर काहीसे घसरले.आनंदाची बाब म्हणजे निफ्टी २५,४०० च्यावर बंद झाला.सेन्सेक्सही दिवसभराच्या उलाढालीनंतर ३०० अंकांच्या वाढीसह बंद झाला. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हने व्याज दरात कपात केल्यामुळे मिडकॅप आणि स्मॉलकॅप निर्देशांकांमध्ये घसरण झाली.व्यवहाराअंती सेन्सेक्स २३६.५७ अंकांच्या वाढीसह ८३,१८४.३० अंकांवर बंद झाला. तर निफ्टी ३८.२५ अंकांच्या वाढीसह २५,४१५.८० अंकांवर बंद झाला.
