मुंबई – शेअर बाजाराने सुरुवातीलाच ऐतिहासिक शिखर गाठले. सेन्सेक्स आणि निफ्टीने नवीन रेकॉर्ड केले. सेन्सेक्स पहिल्यांदाच 80 हजारांच्या पार गेला. बीएसई सेन्सेक्सने 364.18 अंकाची कमाई केली. त्यामुळे सेन्सेक्स 79,840.37 अंकावर उघडला. एनएसई निफ्टी 86.80 अंक वा 0.36 टक्क्यांसह उसळला. निफ्टी 24,228.75 स्तरावर पोहचला. BSE चे मार्केट कॅप आज 443.14 लाख कोटी रुपयांवर पोहचले आहे.
