शेअर बाजारात घसरण सेन्सेक्स ७३,६७७ वर

मुंबई

शेअर बाजारात आज चार सत्रांतील तेजीला ब्रेक लागला. बाजारात आज काही प्रमाणात विक्री झाली. सेन्सेक्स १९५ अंकांनी घसरून ७३,६७७ वर बंद झाला. निफ्टी ४९ अंकांच्या घसरणीसह २२,३५६ वर स्थिरावला. ऑटो निर्देशांक १ टक्क्यांनी, ऑईल आणि गॅस, पॉवर आणि रियल्टी प्रत्येकी ०.५ टक्क्याने वाढले. आयटी आणि एफएमसीजी निर्देशांक प्रत्येकी १ टक्क्याने घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top