मुंबई – शेअर बाजारातील तेजी आजही कायम राहिली. बँकिंग, ऑटोमोबाईल आणि ऊर्जा क्षेत्रातील जोरदार खरेदीमुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक विक्रमी पातळीवर बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ३८४ अंकांनी वधारून ८४,९२८ या विक्रमी पातळीवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १४८ अंकांनी वधारून २५,९३९ अंकांच्या विक्रमी पातळीवर बंद झाला.सेन्सेक्समधील ३० पैकी २१ कंपन्यांचे शेअर वाढीसह तर ९ कंपन्यांचे शेअर घसरणीसह बंद झाले. दुसरीकडे मिड कॅप कंपन्यांमध्ये सर्वात मोठी घसरण झाली.
