मुंबई
जागतिक सकारात्मक संकेतांमुळे भारतीय शेअर बाजारातील सेन्सेक्स आणि निफ्टी आज सलग चौथ्या सत्रांत वाढून बंद झाले. सेन्सेक्स ११४ अंकांनी वाढून ७३,८५२ वर स्थिरावला, तर एनएसई निफ्टी ३४ अंकांच्या वाढीसह २२,४०२ वर बंद झाला. बीएसई मिडकॅप ०.९ टक्क्यांनी आणि स्मॉलकॅप ०.८ टक्क्यांनी वाढून बंद झाला. बाजारात सर्वाधिक खरेदी धातू आणि आरोग्य क्षेत्रातील शेअरमध्ये झाली.