शेअर बाजारात पुन्हा तेजी सेन्सेक्स ७३,००० वर बंद

मुंबई

शेअर बाजारात आज दोन सत्रांतील घसरणीला ब्रेक लागला. आजच्या व्यवहारात सेन्सेक्स ३०५ अंकांनी वाढून ७३,०९५ वर बंद झाला. निफ्टी ७६ अंकांच्या वाढीसह २२,१९८ वर स्थिरावला. आज सुमारे १,३४० शेअर्स वाढले. तर १,९६८ शेअर्स घसरले आणि ७२ शेअर्समध्ये कोणताही बदल दिसून आला नाही. टाटा मोटर्स, टीसीएस, पॉवर ग्रिड, इंडसइंड बँक, भारती एअरटेल, सन फार्मा, जेएसडब्ल्यू स्टील, टाटा स्टील हे शेअर्स आज तेजीत राहिले. बजाज फायनान्स, एसबीआय, बजाज फिनसर्व्ह, ॲक्सिस बँक हे शेअर्स घसरले. निफ्टीवर टाटा मोटर्स, टीसीएस, इंडसइंड बँक, पॉवर ग्रिड कॉर्प आणि सन फार्मा हे शेअर्स तेजीत होते. हीरो मोटोकॉर्प, बजाज फायनान्स, एसबीआय, डिव्हिस लॅब्स हे शेअर्स घसरले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top