मुंबई – शेअर बाजाराच्या सुरुवात आज तेजीसह झाली होती. मात्र त्यानंतर घसरण सुरू झाली ती बाजार बंद होईपर्यंत सुरूच राहिली. त्यामुळे दोन्ही प्रमुख निर्देशांक घसरणीसह बंद झाले.मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स ८२० अंकांनी घसरून ७८,६७५ अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निर्देशांक निफ्टी २५७ अंकांच्या घसरणीसह २३, ८८३ अंकांवर बंद झाला. तर बँक निफ्टी ७१८ अंकांनी घसरून ५१,१५७ अंकांवर बंद झाला.बँकिंग, एफएमसीजी, ऑटो,मेटल, एनर्जी, कंझ्युमर ड्युरेबल, हेल्थकेअर या क्षेत्रांमधील शेअर्समध्ये आजच्या व्यवहारात सर्वात मोठी घसरण झाली.केवळ आयटी आणि रिअल इस्टेट शेअर वाढीसह बंद झाले.
