शेतातील उघड्या विहिरी वन्य प्राण्यासांठी मृत्यूचा सापळा

नागपूर- नागपूरमध्ये कुंपण वा कठडा नसलेल्या शेत शिवारातील विहिरी वन्यप्राण्यासांठी मृत्यूचा सापळा ठरत आहेत. विहरीत वन्यजीव पडण्याच्या घटना वाढत आहेत. २०२० ते २०२४ या चार वर्षात शेतीतील उघड्या विहरीत पडलेल्या ३ वाघ, ११ बिबटे, १५ नीलगायींसह एकूण ६७ वन्यप्राण्यांची रेस्क्यू टीमने सुटका केली होती, अशी माहिती ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरचे कुंदन हाते यांनी दिली.

शेतकरी शासनाच्या योजनेअंतर्गत निधी घेऊन विहीर बांधतात. मात्र विहिरीभोवती भिंत बांधत नाही. थोडेसे पैसे वाचवण्याच्या नादात आपण वन्यप्राण्यांसाठी एक सापळा तयार करीत आहोत याचे भान शेतकऱ्यांना नसते. त अलीकडेच शेतातील विहिरीत पडलेल्या नीलगायीची सुटका करण्यात आली होती. नीलगाय वजनदार असल्यामूळे तिला विहिरीतून बाहेर काढायला खूप मेहनत करावी लागली. अशी मेहनत अनेकदा करावी लागते. कुणी वन्यप्राणी विहिरीत पडत असतो आणि रेस्क्यू टीम त्याला वाचवते. मात्र आता वनविभागाने शासनाच्या इतर विभागांशी समन्वय साधून या सर्वावर तोडगा काढायला हवा. म्हणजे वन्यप्राण्यांचे जीव धोक्यात येणार नाही.