Home / News / श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? उद्योगपती हर्ष गोयंका यांचा सवाल

श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? उद्योगपती हर्ष गोयंका यांचा सवाल

मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा...

By: E-Paper Navakal
Social + WhatsApp CTA

मुंबई- श्रद्धा सर्वांसाठी सारखीच नसते का? असा सवाल उद्योगपती हर्ष गोयंका यांनी लालबागचा राजाच्या व्हायरल व्हिडिओवरून केला आहे. मुंबईतील लालबागचा राजाच्या दर्शनासाठी देश – विदेशातून लाखो भाविक येतात. मात्र इथे सर्वसामान्य भाविक आणि व्हीआयपीना वेगवेगळी वागणूक कशी मिळते, याचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यातलाच एक व्हिडिओ उद्योगपती हर्ष गोयंका यांनी शेअर केला आहे. त्यासोबत त्यांनी लिहिले आहे की, कधी विचार केला आहे की लोक लालबागचा राजा येथे व्हीआयपी दर्शन का घेतात? कारण सर्वसामान्य भाविकांना अनेकदा मोठी प्रतीक्षा आणि गर्दीचा सामना करावा लागतो. ही असमान वागणूक झाली. श्रद्धा सर्वांसाठी सारखी नसते का?

Web Title:
संबंधित बातम्या