नवी दिल्ली
दिल्लीतील जहांगीरपुरी येथील बिर्याणी विक्रेत्याने प्रभू रामाचा फोटो असलेल्या कागदी प्लेट्सवर बिर्याणी दिल्याने उघड झाले. जहांगीरपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बिर्याणी विक्रेत्याला ताब्यात घेतले. सध्या जहांगीरपुरी पोलीस स्टेशन या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
स्थानिक हिंदू संघटनांनी बिर्याणीच्या दुकानात ठेवलेल्या प्लेट्सवर भगवान रामाचा फोटो पाहिल्यानंतर ही बाब उघडकीस आली. प्रभू रामाच्या प्लेट्समधून लोकांना बिर्याणी देत असल्याचे आणि या प्लेट्स वापरल्यानंतर कचरापेटीत टाकून देत असल्याचे संघटनांच्या कार्यकर्त्यांच्या निर्दशात आले. याबाबत त्यांनी विक्रेत्याशी चौकशी केली. यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन भगवान रामाच्या फोटो असलेल्या चार प्लेट्सचे पॅकेट जप्त केले आहेत. पोलिसांनी विक्रेत्याला ताब्यात घेतले. खाद्यपदार्थ विकण्यासाठी धार्मिक भावना दुखावल्याचे उघडकीस आल्यानंतर नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.
श्री रामाचा फोटो असलेल्या प्लेटमधून बिर्याणीची विक्री
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2024/04/WhatsApp-Image-2024-04-24-at-12.43.09-PM-1024x683.jpg)