संभाजीनगरमधून महायुतीकडून संदीपान भुमरे अर्ज भरणार?

संभाजीनगर- राज्यात महायुतीच्या काही जागांचा तिढा अद्याप सुटलेला नसतांनाच महायुतीकडून संदीपान भुमरे यांना निवडणूकीत उतरवले जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे संभाजीनगरमध्ये आता चंद्रकांत खैरे, इम्तियाज जमील आणि संदीपान भुमरे यांच्यात तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे.
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून कॅबिनेट मंत्री संदीपान भुमरे यांना उमेदवारी देण्यात येणार आहे. यासंदर्भात अधिकृत घोषणा झालेली नसली तरी २५ एप्रिल रोजी भुमरे आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
महाविकास आघाडी कडून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या चंद्रकांत खैरे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. ते या मतदारसंघाचे दोनदा खासदार होते. केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड, कॅबिनेट मंत्री अतुल सावे यांची नावेही भाजपाकडून चर्चेत होती. दरम्यान, आता संदीपान भुमरे यांच्या नावावर मात्र आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्कामोर्तब केल्याची माहिती समोर आली आहे.
एमआयएमकडून विद्यमान खासदार इम्तियाज जलील यांना पुन्हा उमेदवारी जाहीर करण्यात आलेली आहे. तर वंचितकडून अफसर खान हे उमेदवार आहेत. त्यामुळे संभाजीनगरमध्ये तिरंगी किंवा चौरंगी लढतीची शक्यता आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top