सत्यपाल सिंग यांना तिसऱ्यांदा संधी नाही

लखनौ – मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंग यांना आगामी लोकसभेसाठी भाजपाने उमेदवारी दिली नाही. सत्यपाल सिंह हे दोन वेळा भाजपाचे खासदार आणि केंद्रीय मनुष्यबळ विकास खात्याचे राज्यमंत्री राहिले आहेत. त्यांना उत्तरप्रदेशच्या बागपतमधून उमेदवारी देण्यात आली होती.

यावेळी उत्तर प्रदेशमध्ये भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये राष्ट्रीय लोक दल (रालोद) हा पक्ष सहभागी झाला आहे.एनडीएच्या जागावाटपात भाजपाने बागपत आणि बिजनौर या दोन जागा रालोदसाठी सोडल्या आहेत. रालोदने या दोन जागांसाठी आपले उमेदवार सोमवारी जाहीर केले. त्यामुळे सत्यपाल सिंग यांचे नाव आपोआप मागे पडले.

रालोदने बागपतमधून डॉ राजकुमार सांगवान यांना तर बिजनौरमधून विद्यमान आमदार चंदन सिंग यांना उमेदवारी दिली आहे.डॉ राजकुमार सांगवान मुरब्बी राजकारणी असून मागील ४४ वर्षांपासून रालोदशी एकनिष्ठ राहिले आहेत. त्यांना उमेदवारी देऊन रालोदने मतदारांना पक्षात ज्येष्ठांचा आणि निष्ठावंतांचा आदर केला जातो असा संदेश दिला आहे,असे मत रालोदचे प्रवक्ता अनिल दुबे यांनी व्यक्त केले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top