सध्याचे राजकारण स्मार्ट, अप्रतिम! अभिनेता शशांक केतकरांचे मत

मुंबई- ‘सध्याचे राजकारण स्मार्ट आणि अप्रतिम दर्जाचे सुरू आहे. यात आपण न पडलेलेच बरे! अगदी प्रामाणिकपणे सांगायचे तर सध्या भाजपाला या सगळ्याची गरज नाही. ते तसेही जिंकणार आहेत हे माझे प्रांजळ मत आहे. पण, जिथे विजयाबद्दल शंका असेल तिथला उमेदवार आपल्या पक्षात घेणे हे सगळेच करत आलेले आहेत. जनतेची प्रगती होणार असेल तर तुम्ही कोणालाही पक्षात घ्या आणि काढा, पण देश चांगल्या पद्धतीने घडवा’, असे मत लोकप्रिय अभिनेता शशांक केतकर याने व्यक्त केले.
राज्यात काय घडतंय त्यावर आपले लक्ष आहे. कारण, कलाकार होण्याआधी आपण एक नागरिक, एक माणूस आहोत. रस्त्यावर चालताना, फिरताना, भाजी घेताना, शूटिंग करताना आपल्याला प्रॉब्लेम दिसतात. त्याबरोबरच देशात होणारी विकासाची कामेही दिसतात. चांगली कामे करणाऱ्यांचे आपण कौतुक करतो, कारण इतकी प्रचंड लोकसंख्या असलेल्या देशाचा वेग न थांबवता विकास करने ही अवघड गोष्ट आहे असेही तो म्हणाला.
‘राज्यात जे सुरू आहे ते पहिल्यांदा घडत नाहीये. मी पाहिलेल्या एका व्हिडिओत म्हटले होते की अमित शहांचा मुलगा बीसीसीआयचा अध्यक्ष कसा काय होऊ शकतो? तो कुठे क्रिकेट खेळला आहे? मग शरद पवारसुद्धा आयसीसीचे अध्यक्ष होते. ते तरी कुठे क्रिकेट खेळले होते? ज्ञान असणाऱ्या आणि त्यासाठी लागणारा बिझनेस आणू शकणाऱ्या योग्य व्यक्तीला त्या त्या जागी बसवले जाते’, असेही शशांक पुढे म्हणाला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top