सहयाद्री प्रतिष्ठान,पुरातत्त्व खात्याची किल्ले पद्मदुर्गावर स्वच्छता मोहीम

मुरुड जंजिरा –
मुरुडच्या शिवकालीन पद्मदुर्गावर सहयाद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन आणि पुरातत्त्व खात्यातर्फे अंतर्गत स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आल्याची माहिती अलिबाग मुरुडचे पुरातत्व खात्याचे आधिकारी बजरंग येलीकर यांनी रविवारी सकाळी बोलताना दिली.
काही महिन्यांपूर्वी पुरातत्त्व विभागातर्फे पद्मजलदुर्गाची स्वच्छता करण्यात आली होती.परंतु काही भागात साफसफाई झाली नव्हती.त्यामुळे रविवारी सकाळी सह्याद्री प्रतिष्ठान श्रीवर्धन आणि पुरातत्व विभाग यांचे संयुक्त विद्यमाने वाढलेली झाडे झुडपे,भिंतीवरील झाडे, पालापाचोळा आदी गोळा करून स्वच्छता करण्यात आल्याचे येलीकर यांनी सांगितले. सुमारे 2 एकरांवर उभा असलेला पद्मदुर्ग शिवकालीन असून आरमारी दृष्टीने त्या काळात महत्त्वाचा होता. हा जलदुर्ग जंजिरा जलदुर्गापासून 3 किमी अंतरावर अरबी समुद्रात उभारण्यात आला आहे.जलदुर्गाचे संपूर्ण नियोजन केंद्र शासनाच्या पुरातत्त्व खात्याच्या अखत्यारीत आहे. इतिहास संशोधक पर्यटक हा जलदुर्ग पाहण्यासाठी खास करून येत असून दिवसेगणिक इतिहास प्रेमी आणि पर्यटकांची संख्या वाढती आहे. पुरातत्त्व खात्याकडून पद्म जलदुर्गाला नवीन दरवाजे बसवण्यात येणार असून तशा प्रकारचा प्रस्ताव मुंबई कार्यालयात पाठविण्यात आल्याचे येलीकर यांनी सांगितले. शिवप्रेमींकडून दरवर्षी या किल्यात पद्मदुर्ग जागर केला जातो. जंजिऱ्यातील सिद्दी राजवटीवर लक्ष ठेऊन शह देण्यासाठी छत्रपती शिवरायांनी पदमदुर्ग उभारला अशी माहिती आहे.तरीही एकूणच पदमदुर्गाविषयी फारशी माहिती उपलब्ध नाही.मुरुड येथून पद्मजलदुर्गात जाण्याची बोटींची सुविधा उपलब्ध असल्याने पर्यटकांना पद्म जलदुर्ग पाहता

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top