सातारा- शहरातील खासदार उदयनराजे भोसले यांच्या जलमंदिर निवासस्थानासमोरील मोती तळ्यात अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे. मोती तलावाचा संपूर्ण परिसर पानवेलींनी झाकोळून गेला आहे. प्रशासनाने नेमलेल्या ठेकेदाराच्या दुर्लक्षतेमुळे ही परिस्थिती उद्भवली असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी केला आहे.
मोती तळ्याचा परिसर स्वच्छ करण्यासाठी या पानवेली मुळापासून काढण्याची गरज आहे. मात्र पालिकेच्या वृक्ष विभागाने नेमलेल्या ठेकेदाराने त्याकडे सपशेल कानाडोळा केल्याचे पानवेली आणखी वाढत आहेत. त्यामुळे हा तलाव दिसेनासा झाला आहे. पालिकेच्या वृक्ष विभागाने याची गांभीर्याने दखल घेऊन ठेकेदाराला कडक शब्दात समज द्यावी, अशी मागणी स्थानिक नागरिक करत आहेत.