सिंगापुर
सिंगापुरचे उपनेते लॉरेंस वोंग सिंगापुरचे पंतप्रधान म्हणून शपथ घेणार आहेत. ५१ वर्षीय वोंग हे सिंगापुरचे प्रसिद्ध अर्थशास्त्रीय अभ्यासक असून एक महत्त्वाचे नेते आहेत. ते आज ली सीन लूंग यांची जागा घेणार आहेत. ७१ वर्षीय लूंग हे गेल्या वीस वर्षांपासून सिंगापुरचे पंतप्रधान राहिलेले आहेत. ली सीन लूंग यांच्या राजीनाम्यामुळे ली कुआन यू के यांच्या नेतृत्वाखालील कौटुंबिक राजघराण्याच्या सत्तेचाही अंत होणार आहे. यापुढे ली हे सिंगापुरच्या मंत्रीमंडळात ज्येष्ठ मंत्री म्हणून कार्य करणार आहेत.
सिंगापुरचे नवे पंतप्रधान लॉरेंस वोंग शपथ घेणार
![](https://navakal.s3.ap-south-1.amazonaws.com/webcontent/2024/05/e01b4898-4f18-46d1-b1ea-e0d607c0b614.jpg)