सिंधुदुर्ग – सिंधुदुर्गाच्या चिपी-पुणे या विमानसेवेला विमानतळ प्राधिकरण आणि संरक्षण मंत्रालयाने परवानगी दिली. गणेश चतुर्थीपूर्वी चिपी-पुणे -चिपी ही विमानसेवा सुरू होणार असून फ्लाय ९१ ही कंपनी प्रत्येक शनिवार आणि रविवारी विमानसेवा देणार आहे. याबाबत खासदार नारायण राणे यांनी केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री राममोहन नायडू यांना पत्र पाठवून सिंधुदुर्ग-पुणे विमानसेवा सुरू करण्यासाठी विनंती केली.