सोरेंग – सिक्कीमच्या सोरेंग भागात आज सकाळी ६ वाजून ५७ मिनिटांनी भूकंपाचे हादरे जाणवले. रिश्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक ४ इतकी नोंदवण्यात आली. भुकंपाचे केंद्र सिक्किमच्या नामची येथे होते.या भूकंपाची परिणाम थेट बिहारच्या किशनगंज पर्यंत जाणवला. जवळ जवळ ४ सेकंद जाणवलेल्या या धक्क्यांमुळे कोणत्याही हानीचे वृत्त नाही. हादरे जाणवल्याबरोबर किशनगंज व इतर भागातील लोकांनी घराच्या बाहेर पळ काढला. तर इतर डोंगराळ भागात हा भूकंप फारसा जाणवला नाही. नेपाळमध्येही या भूकंपाचे हादरे जाणवले.
