सुप्रीम कोर्टाते भीष्मपित मह अॅड. फली नरीमन यांचे निधन

नवी दिल्ली – सर्वोच्च न्यायालयातील ज्येष्ठ कायदे तज्ज्ञ ‘ भीष्मपितामह’ अॅड. फली एस नरीमन यांचे आज सकाळी राजधानी दिल्ली येथे वृध्दापकाळाने निधन झाले. ते ९५ वर्षांचे होते. त्यांच्या पार्थिवावर उदया अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. फली नरीमन हे मागील काही काळापासून अनेक व्याधींनी ग्रस्त झाले होते. त्यांना ह्रदयविकारही जडला होता.
मुंबईतील शासकीय विधि महाविद्यालयातून वकिलीचे शिक्षण पूर्ण करणाऱ्या फली नरीमन यांनी मुंबई उच्च न्यायालयातून वकिलीची प्रॅक्टीस सुरू केली होती. पुढे माजी पंतप्रधान दिवंगत इंदिरा गांधी यांनी देशाच्या अतिरिक्त महाधिवक्तापदी त्यांची नियुक्ती केली. तेव्हापासून ते सर्वोच्च न्यायालयात रुजू झाले. इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली तेव्हा त्याचा निषेध म्हणून नरीमन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.त्यानंतर ते खासगी प्रॅक्टीस करू लागले. त्यांची कारकीर्द आदर्श होती . १९१९ साली पद्मभूषण आणि २००७ साली पद्मविभूषण देऊन त्यांना सन्मानित करण्यात आले . त्यांनी बिफोर मेमरी फेड्स हे आत्मचरित्र लिहिले होते . गाॅड सेव्ह द सुप्रिम कोर्ट हे त्यांचे पुस्तकही खूप गाजले . पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी त्यांना श्रध्दांजलू अर्पण केली .
फली नरीमन यांचे चिरंजीव रोहिंग्टन नरीमन यांनीही आपल्या पित्याचा वारसा समर्थपणे चालविला. रोहिन्टन यांची देखील भारताचे महाधिवक्तापदी नियुक्त करण्यात आली होती. त्यानंतर ते सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीशही झाले होते.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top