जालना – भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी काल रात्री उशिरा मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी येथे भेट घेतली. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी नुकतीच मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली. त्या पाठोपाठ आता भाजपाचे माजी आमदार सुरेश धस यांनी मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे. रात्री एक वाजता सुरेश धस हे अंतरवलीत दाखल झाले. त्यानंतर जवळपास अर्धा तास या दोघांत चर्चा झाली. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर धस यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
